देशा बाबाची 'लव स्टोरी '.
..देशा दगड्या धार व वसीमाय....हे मला म्हणजे पिंपळे गुरूजींना मिळालेली
God gift 2002साली लक्कडकोट ता.शहादा जि.नंदुरबार येथे मी शेती विकत घेतली आणि हा माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला : मास्तर दादा! माल जागलीप थोईले! मी मनलो तोल जागलीप थोईन माल काय खेत वेचाल हाय काय ? त्यामुळे हताश होऊन देशा चालला गेला.....मग माझ्याजवळ माझा मित्र होता सुदाम,तो मनला: दादा यो देशो एक नंबराहा बांड हाय बठो गावाल लुटीन खाई रह्यो याही...सुदामचा त्याच्याविषयीचा तिरस्कार बघून मी ठरविलं की आपण देशालाच जागलीवर ठेऊ या. आणि मी त्याला बोलवायला घरी गेलो .घर कसलं ते एक खोपटचं होतं ते ! त्याला एक मुलगी तिच नाव 'वसी 'दुसरा मुलगा तुकाराम ,व लहान मुस्ताक......ठरलं देशा बांड माझ्या शेताचा जागल्या..महिना रूपये..आठशे.. दिवसामागे दिवस जात होते तसा मला देशाबांडच्या व्यक्तिमत्वावर अभ्यास वाढत होता ...त्याची पत्नी एका हाताला व पायाला लहान पणीच पोलियो झाल्यामुळे वाकडे झालेले .देशा तिला वसुमाय म्हणतो व ती त्याला वसू म्हणून हाक मारते. मुलीचं लग्न झालं ,तुकारामचही लग्न झालं,मुस्ताक माझ्याच शेतात विजेची तार तुटून त्याच्या अंगावर पडल्यामुळे मरण पावला....मी शेतात घर बांधल आहे त्यात देशा व वसुमाय दोघे राहतात. संसार ..दोन पातेल्या ,दोन ग्लास,एक तांब्या ,एक हंडा एक खाट आणि खाटेवर माझ्या गितामायने शिवुन दिलेल्या गोदड्या...बस्स..देशाला गांजा प्यायची सवय म्हणून त्याची सर्वात अनमोल वस्तू म्हणजे चिलीम (गांजा प्यायची) एकच गोष्टीवरुन दोघांची भांडण होते आणि ती म्हणजे ज्या दिवशी चिलीम सापडत नाही एरवी कधीच भांडत नाही.म्हणून तीअनमोल आहे.....वसूमायचं देशावर खूप प्रेम आहे .त्याचा गांजा पिऊन झाल्यावर गोड चहा लागते .म्हणून एक पाय एक हात ओढत वसुमाय पळत दुकानात जाते व चहा साखर आणते तसचं देशा सोमवारी म्हसावदच्या बाजारी जातो तर वसुमायसाठी एक कचोरी व पंजाबी तपकिर न विसरता आणतो...जेव्हा देशा सेतात रात्री पाणी भरतो तेव्हा रात्रभर वसुमाय त्याच्यासाठी चहा करून पाजत असते .असे नो कम्प्लेंट नो डिमांड च प्रेम बघता बघता मी कधी त्यांच्या प्रेमात पडलो हेच मला कळले नाही..............मी त्याला बाबा म्हणतो व वसुमायला मम्मी म्हणतो .वर्षातून एकदा देशा गिरनारी बाबाच्या यात्रेला जातो तेथे सगळे गांजोळे येतात.तेव्हा वसुमाय त्याची अशी तयारी करते जसा देशा युरोपच्या सहलीला चालला.आणि जेव्हा परत येतो तेव्हा तिच्यासाठी बांगड्या आणि तपकिर आणतो .तेव्हा वसूमाय मोठ्या कौतुकाने त्या बांगड्या मला दाखविते.आणि म्हणते :तोह बाबो लानो म्हाल बांगड्या ! तेव्हा तिच्याचेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा असतो...जेव्हा देशा आंघोळ करतांना वसुमायला पाठ घासायला लावतो तेव्हा ती त्याच्या पाठीला लागू नये म्हणून वीस ते पंचवीस फन्यांमधून एक फना निवडते वअतिषय आनंदाने त्याच्या पाठीवरचा मळ काढते...आणि देशाला रागावते. देशाही आनंदाने तिचं रागावण स्विकारतो. असी ही प्रेमकथा अविरत सुरू आहे .........आज दादाभाई पिंपळे कडे जी संपत्ती आहे त्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनी मला मुलगाच मानला आहे .आज त्यांचा महिना वगैरे काही नाही त्यांना लागेल तेव्हढा पैसा,पाहिजे तसे कपडे आणि त्याच्या आरोग्य सुविधेसाठी म्हसावद येथील डाँ आशिष सोनार यांना सांगितल्यामुळे कितीही खर्च आला तरी ईलाज करण्याबाबत डा.सोनार मागेपुढे पहात नाही .वसुमायला दोनवेळेस हार्ट अटेक आला आहे.हे फक्त मला व सोनार डाक्टरांना माहित आहे. देशाला हे माहित नाही व मी त्याला सांगत नाही कारण ते दोघे' 'दो जिस्म एक जान आहेत '.........मी जेव्हा देशाला सांगतो :.बाबा तोहल मय मा गो ली जाई रहाल !तेव्हा तो म्हणतो : ना दादा मय नि वसीमाय जंगलाम खुब खुस हाय, बंगलाम आम्हाल गवतो नाहा.......बाबा आमी तू डायो वई गयो ,बंगलाम आरामसीर रजी. तर तो म्हनतो: दादा तोह बंगलो मय हतो त्याम बांदायो नतं तुभीतं मागतच फकिर हतो नारे....हे देशाचे शब्द शंभर टक्के खरे आहेत.......मी जेवा देशाला विचारतो :बाबा तू मोई जाहा त ई खेती कोन समाई? तो मनतो..मय मोई जाई त माल खेतामाज थोई देजो( शेतात बुजून देजो) नि माहा कारण बाराज दिहाम कय देजी दादा. माल तुकाप बरोह नाहा...तेव्हा माझ्या डोळयातून आपोआपच अश्रु गळायला लागतात..देशा मला नेहमी सांगतो मी मेलो का मला या बांधावर व वसीमाय मेली का रस्त्याकडच्या बांधावर बुजवायचे आणि आमच्या दोघांचे कारण तुच करायचे! कारणाच्या दिवशी कोणाकडूनही भेच घ्यायची नाही कारण ज्या दिवशी माझ कारण राहिल त्यादिवशी लोकांनी म्हटले पाहिजे आज देशाबांडचे कारण नाही तर श्रीमंत दादाभाई पिंपळेच्या देशाबाबाचं कारण आहे.... आणि शेवटी रस्त्याला लागून वसीमाय व माझं मंदीर बांधायचं.........असा आहे माझा देशाबाबा व माझी वसुमाय( मम्मी) आय लव माय देशाबाबा अँन्ड माय मम्मी..........